
Kolhapur Court Updates : मुंबई उच्च न्यायालयाकडील सुमारे चार लाख प्रलंबित खटल्यांपैकी पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील खटल्यांची संख्या पाऊणलाखांच्या घरात आहे. कोल्हापुरात सर्किट बेंचद्वारे फौजदारी, दिवाणी, रिट याचिका, अटकपूर्व जामीन अर्ज, फर्स्ट व सेकंड अपिलाची कामे चालणार आहेत. तर दोन न्यायाधीशांचे बेंचही बसणार असल्याने जनहित याचिकाही दाखल करणे शक्य होणार आहे.