कोल्हापूर : शहराची हद्दवाढ होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हद्दवाढ न झाल्याने शहराच्या विकास प्रक्रियेत अनेक अडथळे येत आहेत. म्हणून माझ्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हद्दवाढीबाबत सकारात्मक आहोत. याबद्दलची प्राथमिक चर्चा झाली असून, हद्दवाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.