

Auto rickshaw drivers protest over limited approval of rickshaw stands in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : शहरात मागणी केलेल्या ४५ रिक्षा थांब्यांपैकी केवळ तीनच थांब्यांना मंजुरी दिल्याने रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. वाहतुकीस अडथळा होतो म्हणून थांब्यांना मंजुरी नाकारण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला. महापालिकेने थांब्यांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.