esakal | महिलांसाठी ‘कोल्हापूर सिटी’ हक्काचे व्यासपीठ | Kolhapur
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

महिलांसाठी ‘कोल्हापूर सिटी’ हक्काचे व्यासपीठ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महिला फुटबॉल खेळाडूंना फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी हक्काचे व्यासपीठ आहे, असे मत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन महिला समितीच्या अध्यक्षा मधुरिमाराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटीच्या सीनिअर महिला संघाच्या निवड चाचणी व सराव शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत जाधव होते. छ्त्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात शिबिरास सुरुवात झाली. ‘विफा वुमन्स फुटबॉल लीग २०२१-२२’ स्पर्धेसाठी इंडियन वुमन्स लीग पात्रता फेरीकरिता महिलांचा संघ निवडला जाणार आहे. माजी नगरसेवक संभाजी जाधव, केएसएचे फुटबॉल सेक्रेटरी प्रा. अमर सासने, वरिष्ठ खेळाडू मैत्री मुनीश्वर, उद्योजक रणजित जाधव, दीपक चोरगे, नरेंद्र पायमल, क्रीडा शिक्षक सुभाष पोवार आदी उपस्थित होते.

loading image
go to top