कोल्हापूर : गळ्यात पक्षाचे स्कार्फ, हातात झेंडे, उमेदवारांच्या घोषणा तसेच हलगी-घुमक्याच्या ठेक्यात प्रभागातून छोट्या पदयात्रा काढत इच्छुकांनी उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केले. काहींनी शक्तिप्रदर्शनही केले..त्यामुळे निवडणूक कार्यालयांचे आवार फुलून गेले. अनेक पक्षांची उमेदवारी जाहीर नसल्याने ए. बी. फॉर्मशिवाय अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी (ता.३०) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची यापेक्षाही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे..Kolhapur Election : सुट्टीच्या दिवशी उमेदवारांनी बांधली पायाला भिंगरी; कोल्हापुरात प्रचाराने घेतला वेग.दोनच दिवस हातात असल्याने शेवटच्या क्षणी काही घोळ होऊ नयेत, याची दक्षता म्हणून अनेक इच्छुकांनी आजचे नियोजन केले होते. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीसह तिसऱ्या आघाडीतील तसेच काही अपक्ष लढवण्याची तयारी करणाऱ्यांनी उत्साहात अर्ज दाखल केले. .महायुतीतील पक्षांतील उमेदवारांची अजून घोषणा झालेली नाही, तरीही ज्यांना उमेदवारीची खात्री आहे, अशा भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील इच्छुकांनी ए. बी. फॉर्मशिवाय तसेच डमी अर्ज दाखल केले. .Kolhapur Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उत्साह शिगेला! दोन दिवसांत तब्बल १०४६ अर्जांची विक्री, प्रत्यक्ष दाखल फक्त तीन.काँग्रेसच्या उमेदवारांनी तसेच शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले. याबरोबरच ज्यांना महायुतीत वा महाविकास आघाडीतून उमेदवारी कापली जाण्याची भीती आहे, त्यांनीही दबाव म्हणून अर्ज भरले.. विविध प्रभागांसाठी सात निवडणूक कार्यालये निश्चित केली आहेत. त्या कार्यालयांच्या अखत्यारीत असलेल्या प्रभागांमधील काही इच्छुक मुहूर्तानुसार सकाळी दहा ते अकराच्यादरम्यान निवडणूक कार्यालयात गेले होते. काहींनी सकाळी प्रभागातून छोट्या पदयात्रा काढत निवडणूक कार्यालये गाठली. .उमेदवार पक्षांच्या चिन्हांचे स्कार्फ, फेटे, टोप्या परिधान करून आले होते. कार्यकर्त्यांनीही स्कार्फ, झेंडे घेतले होते. काही उमेदवारांनी ठिकठिकाणच्या महत्वाच्या चौकांत कार्यकर्त्यांना एकत्र जमवून तिथून मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केले. .काहीजण हलगी-घुमक्याच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आले होते. गर्दी लक्षात घेऊन पोलिसांकडून उमेदवारासोबत पाच जणांनाच कार्यालयांच्या आवारात सोडले जात होते. त्यामुळे कार्यालयांबाहेर कार्यकर्ते, वाहनांची गर्दी झाली होती. काही कार्यालयांमध्ये मात्र कडक शिस्त होती..किचकट अर्जाची डोकेदुखीउमेदवारी अर्ज भरतानाही किचकट असल्याने डोकेदुखी वाटत होती. अनेकांनी वकिलांना दाखवून अर्ज भरून घेतले. अर्जाचा नमुना नवीन असल्याने काही वकिलांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करून अर्ज भरले आहेत. .भरलेले अर्ज दाखल करण्यास आल्यानंतरही कार्यालयांमध्ये विविध प्रभागांनुसार अर्ज स्वीकारण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या तपासणीसही वेळ लागत होता. त्यामुळे कार्यालयांमध्ये उमेदवार, अनुमोदक, सूचकांची गर्दी जाणवत होती. विविध तपासणी केल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे अंतिम अर्ज सादर करावा लागत होता..काही ठिकाणी मुदतीनंतर अर्जदुपारी दोन वाजेपर्यंत अनेक कार्यालयांत कमी संख्येने अर्ज दाखल झाले होते. पण, त्यानंतर उमेदवारांची काही ठिकाणी गर्दी झाली. त्यामुळे काही निवडणूक कार्यालयांमध्ये दुपारी तीनच्या आत आलेल्या उमेदवारांना टोकन देण्यात आले होते. त्यामुळे मुदत संपल्यानंतर त्यांच्या अर्जाची प्रक्रिया केली जात होती..अनेक जणांनी घोषणेपूर्वीच भरले अर्जमहायुतीतील पक्षांच्या उमेदवारी घोषित झालेल्या नाहीत. त्यामुळे शेवटच्या दिवशी गडबड करण्यापेक्षा अनेकांनी आजच अर्ज दाखल केले. त्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अनेक माजी पदाधिकारी, नगरसेवक, त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश होता. .काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर उमेदवारी कापली गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काहींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. काहींनी आज कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या अर्ज दाखल करण्याचे नियोजन केले आहे..प्रशासनाकडून रेकॉर्डिंगउमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपोआपच खर्चाची मर्यादा सुरू होते. त्यामुळे निवडणूक यंत्रणेकडून अशा उमेदवारांचे रेकॉर्डिंग केले जात होते. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेसही रेकॉर्डिंग केले जात आहे. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.