Air Pollution: स्वच्छ हवेसाठी १७.७५ कोटींचा निधी; तरी कोल्हापूरचा श्वास प्रदूषणातच

Kolhapur Clean Air Mission : हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेला यंदा १७.७५ कोटींचा निधी मिळाला. मात्र, यापूर्वीच्या निधीतील अनेक कामे अपूर्ण असून काही यंत्रणा बंद पडल्या आहेत. त्यामुळे स्वच्छ हवेचे उद्दिष्ट अजूनही दूर आहे.
Clean air initiatives in Kolhapur remain incomplete despite substantial government funding

Clean air initiatives in Kolhapur remain incomplete despite substantial government funding

esakal

Updated on: 

कोल्हापूर, : शहरात हवेतील सूक्ष्म धुलिकणांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा’ कार्यक्रमांतर्गत यंदा १७ कोटी ७५ लाखांचा निधी महापालिकेला दिला आहे. आतापर्यंत मिळालेल्या ३० कोटींवरील निधीतून सुचविलेली अजूनही कामे निविदा प्रक्रियेत आहेत. एकीकडे निधीचा तुटवडा असल्याचे सांगितले जात असताना आलेल्या निधीतून अजून कामेच सुचवलेली नाहीत.

Loading content, please wait...