

Kolhapur Congress Protest,
esakal
कोल्हापूर : देशातील निवडणुकांत गैरमेळ करणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना बडतर्फ करून अटक करा. गद्दार ज्ञानेशकुमार राजीनामा द्या. मत वाचवा, लोकशाही वाचवा. संविधान वाचवा, देश वाचवा, अशा जोरदार घोषणा देत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडले. निवडणूक प्रणाली व आयुक्तांविरोधात खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना याबाबतचे निवेदन दिले.