
Harshal Patil Injustice News : जलजीवन मिशन योजनचे काम पूर्ण करूनही राज्य शासनाने तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी केलेल्या कामाचे पैसे वेळेत दिले नाहीत. त्यामुळे हर्षल पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. हातावर काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला.