Kolhapur: स्वीकृत सदस्यांचे वाढणार ‘वजन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Corporation

कोल्हापूर : स्वीकृत सदस्यांचे वाढणार ‘वजन’

कोल्हापूर : नगरपालिकांच्या पदाधिकारी निवडीत मतदानाचा अधिकार नसलेल्या स्वीकृत नगरसेवकांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असल्याने त्यांचे या निवडणुकीत ‘वजन’ वाढणार आहे. पूर्वी नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडला जायचा; पण आता थेट जनतेतून निवडलेले नगराध्यक्षही या निवडणुकीसाठी मतदार म्हणून पात्र आहेत. त्यांचेही महत्त्व वाढणार आहे.

जिल्ह्यात १४ नगरपालिका आहेत. यांपैकी नऊ नगरपालिका जुन्या आहेत, तर पाच नगरपालिकांच्या स्थापनेला अजून पाच वर्षेही झालेली नाहीत. इचलकरंजी ही सर्वांत मोठी नगरपालिका असून, तिथे निवडून आलेले ६२, तर स्वीकृत पाच नगरसेवक आहेत. जयसिंगपूरमध्ये तीन, तर उर्वरित १२ नगरपालिकेत प्रत्येकी दोन स्वीकृत नगरसेवक आहेत. जिल्ह्यातील एकूण स्वीकृत नगरसेवकांची संख्या ३२ आहे. पन्हाळा नगरपालिकेतील एका स्वीकृत नगरसेवकाचे निधन झाल्याने ही संख्या ३१ वर येते.

हेही वाचा: ENG vs NZ : नंबर वन इंग्लंडला नमवत न्यूझीलंडनं गाठली फायनल

याशिवाय १४ नगरपालिकेतील नगराध्यक्षही मतदान करणार आहेत. नगरपालिकेच्या राजकारणात स्वीकृत नगरसेवकांना फारसे महत्त्व नाही. पक्षाचे किती नगरसेवक आले, त्या कोट्यानुसार त्या त्या पक्षांच्या वाट्याला या जागा आलेल्या असतात; पण नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष, विषय समिती सभापती निवडीत या स्वीकृतांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे नेहमीच हे स्वीकृत नगरसेवक नगरपालिकेच्या राजकारणात दुर्लक्षित घटक असतात; पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र या नगरेसवकांना मतदानाचा अधिकार असल्याने त्यांना चांगलेच महत्त्व येणार आहे.

सर्वच नगरपालिकेत असे स्वीकृत नगरसेवक हे त्या त्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांची बांधिलकी पक्षाशी असली तरी ऐनवेळी त्यांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांवरच त्यांची भूमिका ठरत असते. त्यामुळे अशा स्वीकृतांना संधी दिलेल्या नेत्यांनाही ‘भाव’ येणार आहे.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

नगरपालिकेतील पक्षनिहाय स्वीकृत सदस्य

इचलकरंजी-५ ः भाजप, ताराराणी (चाळके गट), राष्ट्रवादी (जांभळे गट), शाहू आघाडी (कारंडे गट), काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य.

जयसिंगपूर-३ ः शाहू आघाडी २, ताराराणी-भाजप- १.

कुरुंदवाड-२ ः भाजप १, काँग्रेस १.

शिरोळ-२ ः काँग्रेस १, भाजप १.

हुपरी-२ ः भाजप १, ताराराणी (आवाडे गट) १.

आजरा-२ ः भाजप १, काँग्रेस १.

मलकापूर-२ ः जनसुराज्‍य २.

पन्हाळा -२ ः जनसुराज्य २.

मुरगूड-२ ः शिवसेना २.

गडहिंग्लज-२ ः जनता दल २.

पेठवडगाव-२ ः युवक क्रांती (सालपे गट) २.

कागल-२ ः भाजप १, शिवसेना १.

चंदगड-२ ः भाजप १, राष्ट्रवादी १.

हातकणंगले-२ ः शिवसेना १, भाजप १.

loading image
go to top