Kolhapur Municipal : १० कोटींच्या थकबाकीसाठी धडक कारवाई; जलसंपदा विभागाचे २४ विभाग सील
कोल्हापूर महापालिकेने साडेदहा कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी जलसंपदा विभागावर धडक कारवाई करत २४ विभाग सील केले आणि १५ पाणी कनेक्शन तोडली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे सिंचन भवन परिसरात खळबळ उडाली.
कोल्हापूर : महापालिकेने आज साडेदहा कोटींचा घरफाळा व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी जलसंपदा विभागाच्या सिंचन भवन कार्यालयातील २४ विभाग सील करत १५ पाणी कनेक्शन तोडली. अचानक झालेल्या या कारवाईने खळबळ उडाली.