

Kolhapur Corporator Harassment Case
esakal
कोल्हापूर: प्रभागातील कचरा न उचलल्याच्या रागातून नगरसेविकेला रस्त्यात अडवून विनयभंग केल्याप्रकरणी तानाजी आनंदराव जाधव (रा. कोल्हापूर) याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरा नगरसेविकेच्या घरी जाऊन कचरा पडलेल्या ठिकाणी चला, छायाचित्रे काढायची आहेत, असे म्हणून वारंवार मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न तो करीत होता.