
कोल्हापूर : जिल्ह्यात ( २६) रात्री बारा ते आज रात्री बारापर्यंत ३७३ व्यक्ती कोरोनामुक्त; तर ७७० व्यक्ती बाधित आढळल्या. गेल्या २४ तासांत एकूण २९ बाधितांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात एकूण १२ हजार २७७ कोरोनामुक्त असून, आजअखेर एकूण बाधित २१ हजारांवर आहेत. जिल्ह्यात ११ हजारांवर बाधितांवर उपचार सुरू असून, १६१ व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. यातील ४२ अतिगंभीर व्यक्तींवर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू असून, जिल्ह्यात दिवसभरात नव्याने एक हजार ८४८ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले.
विजेचा लपंडाव
‘सीपीआर’मध्ये अतिगंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जवळपास २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. अशात सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत सहा ते सात वेळा वीजपुरवठा खंडित झाला. ऑक्सिजन व्यवस्था तसेच व्हेंटिलेटरचा वीजपुरवठा अखंडित राहणे आवश्यक आहे. वीज खंडित झाल्यास रुग्णांनाही धोका पोचू शकतो. ‘सीपीआर’मध्ये जनित्र आहे. तरीही अखंडित विजेसाठी दुरुस्त्या करणे आवश्यक असल्याचे आज स्पष्ट झाले.
कोल्हापूर शहर २१६, इचलकरंजी ७३, करवीर ८१, हातकणंगले १५३, कागल ४९, पन्हाळा ३९, शिरोळ ३८, राधानगरी ४८, शाहूवाडी २२, अन्य राज्ये- १८, अन्य तालुके- ३ ते १६.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.