Kolhapur Crime : १२ कोटी ३५ लाखांची फसवणूक! बाळूमामांच्या दरबारात पाया पडायला आला अन्, पोलिसांच्या सापळ्यात बरोबर अडकला...

Fraud Accused Kolhapur : १२ कोटी ३५ लाख रुपयांची फसवणूक करून फरार झालेला आरोपी बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी आल्यावर पोलिसांच्या सापळ्यात अडकला.
Kolhapur Crime

बाळूमामांच्या दरबारात पाया पडायला आला अन्, पोलिसांच्या सापळ्यात बरोबर अडकला...

esakal

Updated on
Summary

ठळक मुद्दे (Highlights):

१२.३५ कोटींची भलामोठी फसवणूक:

फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दीड महिन्यात रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल ₹12.35 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.

मुख्य आरोपी अटक, मुलगा आधीच तुरुंगात:

मुख्य आरोपी राजेंद्र भीमराव नेर्लीकर (रा. हुपरी) वर्षभर फरार राहिल्यानंतर अखेर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला अटक केली; त्याचा मुलगा बालाजी नेर्लीकर आधीच कारागृहात आहे.

गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक आणि सामाजिक विश्वासाचा गैरवापर:

नेर्लीकरने एका मुनी महाराजांचा विश्वास जिंकून त्यांच्या माध्यमातून भक्त, निवृत्त सैनिक, शासकीय अधिकारी, गृहिणी आदींना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

Kolhapur Hupari Crime News : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दीड महिन्यांत रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल १२ कोटी ३५ लाख रुपयांची फसवणूक करून वर्षभर फरार असलेल्या येथील राजेंद्र भीमराव नेर्लीकर (रा. शिवाजीनगर, हुपरी) या ठकसेनाच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज मुसक्या आवळल्या. या प्रकरणातील दुसरा आरोपी त्याचा मुलगा बालाजी राजेंद्र नेर्लीकर वर्षभरापासून कारागृहात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com