Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Adampur Firing Case : गुन्ह्यात वापरलेले दोन गावठी कट्टे, दोन राऊंड, तलवार, कोयता जप्त केला. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत.
Adampur Firing Case
Adampur Firing Caseesakal
Updated on
Summary

गोळीबारात जखमी मोहितेने दिलेल्या फिर्यादीवरून विनायक कोळी, अनिकेत कोळी, आशिष वाडकर, नितिकेश राऊत (सर्व, रा. पुलाची शिरोली) यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कोल्हापूर : औद्योगिक वसाहतीमधील स्क्रॅप व्यवसायातील वर्चस्वातून दोन टोळ्यांमध्ये गोळीबाराचा थरार आदमापूरमधील (Adampur) एका हॉटेलमध्ये घडला. यात मांडीत गोळी लागून श्रीकांत तानाजी मोहिते (वय ३२, रा. समता कॉलनी, पुलाची शिरोली) जखमी झाला. त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने हालचाली करत दोन्ही टोळ्यांतील १० संशयितांना ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com