
Kolhapur : शहापूर येथे लोटस पार्कसमोरील मोकळ्या मैदानात जुन्या वादातून एका तरुणाने मित्राचा कोयत्याने सपासप वार करून खून केला. डोके, तोंड व मानेवर खोलवर वार झाल्याने गणेश रमेश पाटील (वय २१, रा. आगार, ता. शिरोळ) याचा सांगली शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश याने त्याच्या मामाला हल्लेखोराचे नाव सांगत आपल्यावर कशाप्रकारे हल्ला झाला, याचीही माहिती दिली. या माहितीवरून शहापूर पोलिसांनी अभिषेक सुकुमार मस्के (१९ रा. आगार, ता. शिरोळ) याला खुनाचा गुन्हा दाखल करत अटक केली. न्यायालयाने त्याला १८ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे.