स्टॉलधारकावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न; नागरिकांकडून बेदम चोप

यातील दोघांना संतप्त नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला.
 crime
crime sakal
Updated on: 

कोल्हापूर : राजाभाऊ भेळचे मालकांवर तिघांनी जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केला. यातील दोघांना संतप्त नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा मात्र तिथून निसटला. शाहू मैदान परिसरात सायंकाळी हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सुरू आहे. (Kolhapur Crime News)

याबाबत पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राजाभाऊ भेळ चे मालक रवींद्र शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शाहू मैदान येथील एका गाळ्यात भेळ चा स्टॉल सुरू केला आहे. चार-पाच दिवसापूर्वी अज्ञातांनी खाऊ गल्ली येथील भेळच्या गाडीवर दगड मारला होता. दरम्यान काल रात्री तिघेजण त्यांच्या स्टॉलवर भेळ खाण्यासाठी आली होते. कट्ट्यावर बसून भेळ खाताना त्यांनी आपल्याकडील शास्त्राचे प्रदर्शन ही केली होते. त्यातीलच एक संशयित आज साडे चारच्या सुमारास स्टॉलवर आला. त्याने भेळ मागितली.

 crime
हे शिवरायांचं राज्य! इथं दंडुकशाही चालणार नाही...: चित्रा वाघ

त्याच्यासोबत त्याचे दोन साथीदार इथे आले. स्टॉलवरील कर्मचाऱ्यांनी त्यांना भेळ दिली. त्यातील एक जण स्टॉल जवळच थुंकला. याची विचारणा येथील कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान एकाने आपल्याकडील शास्त्र काढून शिंदेंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी प्रसंगावधान राखून त्याला वेळीच ढकलून दिले. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. हे पाहून हल्ल्याचा प्रयत्न करणारा मात्र तिथून निसटला.

संतप्त नागरिकांनी त्याच्या दोघा साथीदारांना पकडून बेदम चोप दिला. याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दोघा संशयितांना ताब्यात घेतले. पसार झालेल्या संशयिताचा शोध सुरू केला. घटनेची माहिती मिळताच शिंदे यांचे नातेवाईक व मित्रपरिवार आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com