Kolhapur Crime : सहा लाखांची सुपारी देऊन सख्या भावानेच केला भावाचा गेम; तमदलगे डोंगरावर डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून

Tamdalge Case : मंगळवारी सकाळी तमदलगे डोंगरावर फिरायला गेलेल्या नागरिकांना अविनाश ऊर्फ दीपक पाटील याचा मृतदेह दिसला होता. निर्जनस्थळी तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले होते.
Tamdalge Case
Tamdalge Caseesakal
Updated on

जयसिंगपूर : तमदलगे (ता. शिरोळ) येथील डोंगरावर (Tamdalge Dongar) निमशिरगावमधील तरुणाच्या खूनप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी (Jaysingpur Police) बारा तासांतच सहा संशयितांना जेरबंद केले. सहा लाखांची सुपारी देऊन सख्या भावानेच भावाचा गेम केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. मृत अविनाश ऊर्फ दीपक हा दारू पिऊन कुटुंबीयांना त्रास देत असल्याने त्याचा सुपारी देऊन खून केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com