Kolhapur Crime : वसुलीस गेलेल्या वायरमनला धक्काबुक्की; अदखलपात्र गुन्हा दाखल
वीज बिलाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेले निवास पाटील यांना याने दमदाटी केली. यानंतर ते निघून जात असताना पुन्हा पाठलाग करून शिवीगाळ झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कोल्हापूर : वीज बिलाच्या वसुलीला गेलेल्या वायरमनला गॅरेज मालकाकडून शिवागीळ करून धक्काबुक्कीचा प्रकार आज दुपारी महावीर कॉलेजसमोर घडला. याप्रकरणी ओंकार दिलीप मोरे (वय २२, रा. डायना पार्क, नागाळा पार्क) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.