

Tanishka members
sakal
कोल्हापूर : ‘स्मार्ट’फोनच्या या युगात तुम्ही ‘स्मार्ट’ आणि ‘सजग’ असण्याची आवश्यकता आहे. तुमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन सायबर चोरटे शेकडो किलोमीटर लांबूनच खिशावर डल्ला मारतात, अनोखळ्या व्यक्तीला माहिती देताना विचार केल्यास तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता, सावधगिरी हाच आर्थिक व सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा उपाय असल्याचा सल्ला पोलिस निरीक्षक महेश इंगळे व उपनिरीक्षक अतीष म्हेत्रे यांनी दिला.