Ranoji tiger sighting in Dajipur Wildlife Sanctuary
esakal
राशिवडे बुद्रुक (जि. कोल्हापूर) : यंदाच्या पर्यटन हंगामाला सुरुवात होताच दाजीपूर अभयारण्यात ‘राणोजी’ या वाघाने पर्यटकांना दर्शन देत जंगल सफारीची रंगत वाढवली. आज सकाळी सातच्या सुमारास होळीचा माळ परिसरात पर्यटकांच्या वाहनासमोर हा वाघ अचानक (Dajipur tiger sighting today Kolhapur) आला. काही क्षण थांबून त्याने वाहनातील पर्यटकांकडे न्याहाळले आणि त्यानंतर गर्द झाडीत अदृश्य झाला. पनवेल आणि कोल्हापूर येथून आलेल्या पर्यटकांना वाघाचे दर्शन झाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.