Dajipur wildlife sanctuary news Kolhapur
esakal
कोल्हापूर : दाजीपूर अभयारण्यात पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले. मात्र, याचा व्हिडिओ काही कालावधीतच सोशल मीडियावरून जगभर प्रसिद्ध झाला. यामुळे तेथील वाघासह अन्य वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला (Dajipur tiger video viral on social Media) आहे. जंगल सफारीच्या निमित्ताने येथे पर्यटनात वाढ होत असली, तरी वन विभागाने वन्यजीव संरक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. नियमांच्या चौकटीत पर्यटन केले गेले, तरच जंगल व वन्यजीव सुरक्षित राहतील, अशी भावना पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.