
कोल्हापूर: शिंगणापूर योजनेवरील पाणी उपसा यंत्रामध्ये बिघाड झाल्याने या योजनेवरील चार पंपांचा पाणी उपसा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे ए, बी व ई वॉर्डासह भागात दैनंदिन पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने होत नाही. शिंगणापूर योजनेचा पाणीपुरवठा उद्यापासून (ता. १) एक दिवस आड करण्यात आला आहे. ए, बी, वॉर्डमधील संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, साने गुरुजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, क्रशरचौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, साळोखेनगर टाकीवरील संपूर्ण भाग, जरगनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, कळंबा फिल्टरवरील अवलंबून संपूर्ण भाग, शिवाजी पेठ परिसरातील काही भाग, संपूर्ण मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, गजानन महाराजनगर, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकरनगर, सुभाषनगर पंपिंगवरील अवलंबून परिसर, शेंडापार्क टाकीवरील अवलंबून परिसर, जवाहरनगर, वाय, पी. पोवारनगर, मिरजकर तिकटी आदी ठिकाणी शुक्रवारी (ता. १) पाणीपुरवठा होईल. त्यानंतर एक दिवसाआड होईल.
संपूर्ण राजारामपुरी पहिली ते तेरावी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, शाहूमिल कॉलनी, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, साईक्स एक्स्टेंन्शन, पाच बंगला, कोरगावकर परिसर, राजाराम रायफल परिसर, माळी कॉलनी, मोहल्ला परिसर, छत्रपती कॉलनी, दिघे हॉस्पिटल परिसर, पांजरपोळ, सम्राटनगर, प्रतिभानगर, पायमल वसाहत, जगदाळे कॉलनी, आयडियल सोसायटी, तोरणानगर, काशीद कॉलनी, माने कॉलनी, चाणक्यनगर, एसटी कॉलनी, संयुक्त महाराष्ट्र सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन परिसर, ग्रीनपार्क परिसर, शाहूपुरी पहिली ते चौथी गल्ली, व्यापार पेठ, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल, महाडिक वसाहत, मार्केट यार्ड आदी ठिकाणी शनिवारी (ता. २) आणि त्या पुढे एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल. पंप दुरुस्तीचे कामकाज पूर्ण होताच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महापालिकेने म्हटले आहे.
असा होईल पुरवठा
यासाठी ए, बी वॉर्ड व संलग्न उपनगरे, ग्रामीण भागास शुक्रवारी (ता. १) तसेच ई वॉर्ड व संलग्न उपनगरे, ग्रामीण भागास शनिवारी (ता. २) व पुढे याप्रमाणे एक दिवस आड पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.