Kolhapur: मृतांच्या वारसांना दमडीही नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळीतकांड प्रकरण

कोल्हापूर : मृतांच्या वारसांना दमडीही नाही

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : सीपीआरमधील कोरोना वॉर्डाला आग लागली, सहाजणांचे मृत्यू झाले. त्याला दीड वर्ष झाले. मात्र, मृतांच्या नातेवाइकांना अद्यापि मदतीची दमडीही मिळालेली नाही. चौकशी अहवालात ऑक्सिजन अलार्म, सर्किट बोर्ड यांच्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला होता. तांत्रिक सुविधांची पूर्तता करावी, मृत्यूची कारणमीमांसा करावी, आदी सूचना केल्या होत्या. मात्र, अपवाद वगळता सर्व सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाने दडपल्या आहेत.

अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयातील कोरोना वॉर्डाला आग लागली. मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्र्यांपर्यंत सर्वांनी ही घटना गांभीर्याने घेतली. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. या घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. वैद्यकीय अधिकारी बडतर्फ झाले. अशीच घटना दीड वर्षापूर्वी सीपीआरमध्ये घडली. रुग्णालयातील कोरोना वॉर्डाला आग लागली होती. या आगीत सहाजणांचा मृत्यू झाला. आठ वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त झाली. दीड महिन्यानंतर तत्कालीन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांना अहवाल दिला.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

हा अहवाल राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना पाठविला. त्यानंतर सीपीआरमध्ये पुढे काहीही झालेले नाही. अहमदनगरच्या आगीची घटना घडल्यानंतर दोन-तीन दिवसांत मृतांच्या वारसांना न्याय मिळाला, तर कोल्हापुरातील मृतांच्या नातेवाइकांवर दीड वर्ष झाले तरी अन्यायच वाट्याला आला.

चौकशी अहवालातील तपशील असे ः

शॉर्टसर्किटने आगीच्या ठिणग्या पडल्या, त्याच्याखाली ऑक्सिजन अलार्म होता. तेथेच सर्किट बोर्डही होता. एक बाजूला बंद व्हेंटिलेटर होता. तेथे धूर झाला. धूर वाढला, याचवेळी सुरक्षारक्षकांनी रुग्णांना अन्य वॉर्डात हलविले. यात व्हेंटिलेटरवरील चार रुग्णांचा त्याच दिवशी मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.

चौकशी समितीने केलेल्या सूचना काय झाले सूचनांचे

डेथ ऑॅडिट करावे मृतांचे शवविच्छेदन झालेच नाही, डेथ ऑॅडिट आजअखेर झाले नाही

इमारत विभागाचे स्ट्रक्चरल ऑॅडिट करावे इमारतीचे स्ट्रक्चरल ऑॅडिट झाले; पण तांत्रिक सुरक्षेचे बदल झाले नाहीत

फायर व इलेक्ट्रिकल ऑॅडिट करावे अग्निशामक दलाच्या सूचनांनुसार फक्त अग्निप्रतिबंधक मशिन बसवले बाकी काहीच नाही

ऑक्सिजन ऑडिट करावे ऑॅक्सिजन ऑॅडिट नियमित होते. मात्र, ऑॅक्सिजन तंत्रज्ञाची स्वतंत्र नियुक्ती नाही.

loading image
go to top