
कोल्हापूर : हळदीच्या माजी उपसरपंचाला अटक
कोल्हापूर : ग्रामपंचायतचे बनावट ठराव, प्रतिज्ञापत्र, बनावट शिक्के तयार करून सात लाख रुपयांचा क्रीडांगण निधी अपहार केल्याप्रकरणी हळदीच्या माजी उपसरपंचाला अटक केली. तत्कालीन ग्रामसेवक आणि ठेकेदारावर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक झालेली नाही. याबाबत विद्यमान उपसरपंच यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सांगितले, की माजी उपसरपंच शंकर बळवंत पाटील (वय ४०, रा. हळदी), तत्कालीन ग्रामसेवक राजाराम हरी परीट (वय ५२, रा. बापुराम नगर,कळंबा), ठेकेदार प्रवीण सर्जेराव पाटील (रा. महे, ता. करवीर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. उपसरपंच पाटील याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केल्यावर ११ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. २०१९-२० या कालावधीत हा गैरव्यवहार झाल्याची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.
पोलिसांनी सांगितले, हळदी (ता.करवीर) येथील माजी उपसरपंच पाटील (वय ४०) यांनी सरपंच नसताना सुद्धा बनावट कागदपत्रे, नकाशे, प्रतिज्ञापत्रे तयार केली. तत्कालीन ग्रामसेवक परीट यांच्यासोबत ग्रामपंचायतचे बनावट लेटर हेड तयार करून व बनावट हमीपत्र देऊन क्रीडा अधिकारी यांच्याकडून ७ लाख रुपये अनुदान ग्रामपंचायत बँक खात्यावर जमा करून घेतले.
तसेच सरपंच व ग्रामपंचायतचे बनावट शिक्के तयार करून ठेकेदार प्रवीण पाटील याचे नावे ‘बेरर चेक’ने पैसे काढून स्वतःकरिता अपहार केल्याची फिर्याद विद्यमान उपसरपंच बाजीराव निवृत्ती पाटील यांनी दिली. फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे करत आहेत.
Web Title: Kolhapur Deputy Panch Haldi Arrested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..