Kolhapur Citizen Complaint : अंमलदारांकडून तक्रारदाराचीच उलट तपासणी डायल ११२ ची तत्परता; पोलिस ठाण्याकडून हरताळ; वरिष्ठांकडून कारवाई होणार का?

Sound System Complaint at Pachgaon Road Raises Concerns : कोल्हापुरात डायल ११२ वर साउंड सिस्टीम आणि भांडणाबाबत तक्रार करणाऱ्या नागरिकांनाच पोलिसांनी घटनास्थळी बोलावल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
Kolhapur Citizen Complaint

Kolhapur Citizen Complaint

esakal

Updated on

कोल्हापूर : तातडीच्या मदतीसाठी ‘डायल ११२’ ही पोलिसांची हेल्पलाईन आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयातील कक्षामधूनही तत्परतेने ही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतो; परंतु, घटनास्थळी पोहोचणाऱ्या संबंधित पोलिस ठाण्याच्या अंमलदारांकडून तक्रारदाराचीच उलट तपासणी केली जात आहे. ‘तुम्ही कॉल केला होता का? काय तक्रार आहे इथे येऊन सांगा’, असे बोलून ज्याच्याविरोधात तक्रार केली आहे तिथेच बोलावण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. साउंड सिस्टीमबाबत तक्रार केलेल्या एका नागरिकाची मंडळासमोर बोलावून अशीच पंचाईत करण्यात आली. पाचगाव रोडवर सोमवारी सायंकाळी एका मंडळाने मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम लावली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com