esakal | कोल्हापूर जिल्ह्यातील 78 गावात 100 टक्के लसीकरण पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर जिल्ह्यातील 78 गावात 100 टक्के लसीकरण पूर्ण

कोल्हापूर जिल्ह्यातील 78 गावात 100 टक्के लसीकरण पूर्ण

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यातील (kolhapur district) 78 गावांमध्ये 45 वर्ष आणि त्यापुढील वयांच्या नागरीकांचे 100 टक्के लसीकरण (covid-19 vaccination) पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांचेही 100 टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे.

या 78 गावांमधील 33 गावांमध्ये कोरोनाचे शुन्य रुग्ण, 30 गावांत 5 पेक्षा कमी रुग्ण, 9 गावांमध्ये 10 पेक्षा कमी रुग्ण तर 6 गावांत 10 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सध्या उपचाराधीन आहेत. या 78 गावांनी नियोजनबध्दरित्या प्रयत्न केल्यामुळे केवळ 244 इतके रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुर आहेत. लवकरच हे रुग्ण बरे होतील असा आशावाद आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. इतर गावांनीही कोरोनाला गावच्या वेशीवर थोपवून धरावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

हेही वाचा: 'कोकणातून कोणीही पंतप्रधान झाले तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही'

loading image