esakal | दिलासादायक ः कोल्हापूर जिल्ह्यात दिवसात 781 जण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

In Kolhapur district, 781 people are released from coronation in a day

कोल्हापूर ः जिल्ह्यात रविवारी रात्री बारा ते आज रात्री बारापर्यंत कोरोनाचे 465 नवीन रुग्ण आढळले, तर तब्बल 781 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 16 रुग्णांची मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता एकूण 19 हजार 801 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. आजअखेर एकूण 563 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. 10 हजार 847 रुग्ण ठणठणीत बरे होवून घरी गेल आहेत. तर, 8 हजार 391 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. 

दिलासादायक ः कोल्हापूर जिल्ह्यात दिवसात 781 जण कोरोनामुक्त

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर ः जिल्ह्यात रविवारी रात्री बारा ते आज रात्री बारापर्यंत कोरोनाचे 465 नवीन रुग्ण आढळले, तर तब्बल 781 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 16 रुग्णांची मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता एकूण 19 हजार 801 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. आजअखेर एकूण 563 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. 10 हजार 847 रुग्ण ठणठणीत बरे होवून घरी गेल आहेत. तर, 8 हजार 391 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. 
जिल्ह्यात ज्या प्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याप्रमाणे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात आज एका दिवसात तब्बल 781 रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत. हे आशादायक चित्र आहे. रुग्णांना वेळेत बेड मिळावेत, ऑक्‍सिजन पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन व सीपीआर प्रशासन प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात आज अखेर आजरा तालुक्‍यात 317, भुदरगड 402, चंदगड 481, गडहिंग्लज 442, गगनबावडा 39, हातकणंगले 2116, करवीर 2130, पन्हाळा 613, राधानगरी 479, शाहुवाडी 454, शिरोळ 950 कोरोना रुग्ण आढळले आहेत. 
कोल्हापूर शहर व इचलकरंजी वगळता इतर तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसेच, दररोज आढळणाऱ्या रुग्णांमध्येही घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहरावर लक्ष केंद्रीत करुन आवश्‍यक उपाय योजना केल्या जात आहेत. 

एकूण कोरोनाग्रस्त ---19हजार801 
एकूण कोरोनामुक्त---- 10हजार847 
मृत्यू ----------------- 563 
सद्या उपचार घेणारे ---- 8हजार391 

संपादन -यशवंत केसरकर
 
loading image
go to top