जिल्हा बँकेतही ‘महाविकास’ चा प्रयोग; भाजप रिंगणात उतरण्याच्या तयारीत

बिनविरोधसाठी प्रयत्न; भाजपही रिंगणात उतरण्याच्या तयारीत
bank
banksakal media
Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषद, (ZP,GOkul Milk)गोकुळनंतर आता जिल्हा बँकेतही राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग राबवून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. सध्या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, ते कायम ठेवण्याचा बँकेचे अध्यक्ष व ग्रामाविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रयत्न राहतील. दरम्यान, ‘गोकुळ’सह कागल विधानसभा निवडणुकीचेही पडसाद बँकेच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. त्यातून भाजप काही जागा लढवण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने भाजपनेही चाचपणी सुरू केल्याचे बोलले जाते.

राज्य सरकारने १५ जिल्हा बँकांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवली. यात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे. बँकेच्या निवडणुकीसाठीची ठराव संकलनाची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. बँकेच्या एकूण ११ हजार ४४८ सभासद संस्थांपैकी ८ हजार ५०० संस्थांचे ठराव दाखल झाले आहेत. येत्या एक-दोन दिवसांत बँकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होऊन त्यावरील हरकतीचा कार्यक्रम सुरू होणार आहे.

बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने राजकीय हालचालीही गतिमान झाल्या आहेत. बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पहिल्यापासून श्री. मुश्रीफ आग्रही आहेत. तथापि ‘गोकुळ’च्या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. ‘गोकुळ’चे त्यावेळी नेतृत्व करणारे आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक जिल्हा बँकेत संचालक आहेत. श्री. पाटील यांच्या मुलाला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यात श्री. मुश्रीफ यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील यांनी महत्त्वाची भूमिका घेतली व राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता असल्याने श्री. पाटील सत्तारूढ गटासोबत राहतील. श्री. महाडिक यांची मात्र या निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची असेल.

जिल्हा परिषद, ‘गोकुळ’प्रमाणेच राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोगच जिल्हा बँकेत राबवला जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे आठ, तर काँग्रेसचे पाच संचालक आहेत. खासदार प्रा. संजय मंडलिक व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने ह्या शिवसेनेच्या म्हणून संचालक मंडळात असतील. जनसुराज्यचे दोन संचालक आहेत. अनिल पाटील अपक्ष विजयी झाले आहेत. बँकेचे संचालक असलेले अशोक चराटी व पी. जी. शिंदे यांनी मध्यंतरी भाजपमध्ये प्रवेश केला आहे; पण शिंदे सध्या बँकेत सत्तारूढ गटासोबत आहेत. विकास सोसायटी गटातील बारा जागा सोडता इतर जागेवर काही ठिकाणी भाजपकडून उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे. बँकेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल.

bank
ढिसाळ कारभार : कोरोना झाला जूनला; यंत्रणा जागली ऑगस्टला!

आबिटकर यांचेही प्रयत्न

‘गोकुळ’च्या निवडणुकीत आताच्या सत्तारूढ गटात दोन जागा मिळवलेले आमदार प्रकाश आबिटकर हेही जिल्हा बँकेत एखादी जागा मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. त्यातून त्यांचे बंधू माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर पतसंस्था गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

गगनबावड्यात तिढा कायम

गगनबावड्यातून पालकमंत्री सतेज पाटील पुन्हा रिंगणात उतरण्याची चर्चा आहे. या तालुक्यातून पी. जी. शिंदे संचालक मंडळावर निवडून आले आहेत. श्री. शिंदे यांचे श्री. मुश्रीफ यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध पाहता महाविकास आघाडीचा या तालुक्यातील उमेदवारीचा तिढा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com