

Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
sakal
कोल्हापूर: जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पात्र संस्थांची प्रारूप यादी मंगळवारी (ता. ६) प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर या यादीवर तीन नोव्हेंबरपर्यंत हरकती मागवून त्याचदिवशी अंतिम यादी प्रसिद्ध होईल. मतदार यादीचा हा संभाव्य कार्यक्रम पाहता बँकेच्या निवडणुकीसाठी २० किंवा २७ डिसेंबरला मतदान होण्याची शक्यता आहे.