esakal | दिलासादायक; कोल्हापुरात कोरोनाची साथ येतेय नियंत्रणात
sakal

बोलून बातमी शोधा

दिलासादायक; कोल्हापुरात कोरोनाची साथ येतेय नियंत्रणात

दिलासादायक; कोल्हापुरात कोरोनाची साथ येतेय नियंत्रणात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : कोरोना नियंत्रणात (covid-19) आणण्यासाठी घरोघरी दैनंदिन सर्वेक्षण करून अँटिजेन व आरटीपीसीआर (RT-PCR) चाचण्या सुरू आहेत. परिणामी, रुग्ण्संख्येचा आलेख कमी होत असून, कोरोनाची साथ नियंत्रणात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी केले आहे.

डॉ. साळे म्हणाले, ‘‘कोवीडच्या दुसऱ्या लाटेत १ ते ७ एप्रिलदरम्यान १२ हजार २७ चाचण्या केल्या. त्या वेळी एक हजार २५८ रुग्णसंख्या होती. पॉझिटीव्हीटी दर (positivity rate) १०.४६ टक्के होता. प्रति एक लाख लोकसंख्येत तीन हजार १०८ रुग्णांची तपासणी करण्यात येत होती. २९ एप्रिल ते ५ मेदरम्यान ४४ हजार २५१ चाचण्या केल्या. त्या वेळी नऊ हजार ८४ रुग्णसंख्या होती. या आठवड्याचा पॉझिटिव्हीटी दर २०.५३ टक्के होता, तर २७७ रुग्णांचे मृत्यू झाले होते.

हेही वाचा: महाराष्ट्र राज्याला जोडणारे आंतरराज्य मार्ग बंद

२७ मे ते २ जूनमध्ये ६८ हजार २३१ चाचण्या झाल्या. त्यात ११ हजार ९२१ रुग्ण सापडले. या आठवड्याचा पॉझिटीव्हीटी दर १७.४७ टक्के होता; तर २६६ रुग्णांचा मृत्यू झाला. प्रतिलाख लोकसंख्येत १७ हजार ६२१ रुग्णांची तपासणी केली होती. १७ ते २३ जून आठवड्यात एक लाख १८ हजार ५२१ चाचण्या केल्या. या वेळी आठ हजार ५१२ रुग्ण सापडले. पॉझिटीव्हीटी दर ७.१८ टक्के इतका खाली आला होता. या आठवड्यात २३७ रुग्णांचा मृत्यू झाला.

२४ ते ३० जूनदरम्यान एक लाख ३० हजार २०६ चाचण्या केल्या. यात ११ हजार ४५० रुग्ण सापडले. या आठवड्याचा पॉझिटीव्हीटी दर ८.७९ टक्के इतका खाली आला होता. २२७ रुग्णांचा मृत्यू झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात टेस्टची संख्या वाढवली. एकूण ९१ हजार २५९ टेस्ट करण्यात आल्या. नऊ हजार ८१० रुग्ण सापडले. हया आठवडयाचा रुग्ण पॉझिटिव्हीटी दर १०.७५ टक्के खाली आला. या आठवड्यात १७१ रुग्णांचा मृत्यू झाला.

लाट ओसरू लागली

रुग्ण्संख्येचा आलेख कमी होत असून, कोरोनाची साथ ओसरण्याची लक्षणे आहेत. दैनंदिन रुग्ण बरे होणाऱ्याची संख्याही दैनंदिन बाधित रुग्णापेक्षा अधिक आहे. मृत्यूदर कमी करण्यात यश येत आहे. उपचारांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. तरीही नागरिकांनी घाबरू नये, सतर्क राहावे, असे आवाहन डॉ. साळे यांनी केले.

हेही वाचा: महाराष्ट्र आणि देशातील वारकऱ्यांसाठी; आठवणीतील वारी

loading image