esakal | जिल्हा परीषद मतदारसंघ फेररचनेकडे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

Kolhapur : जिल्हा परीषद मतदारसंघ फेररचनेकडे लक्ष

sakal_logo
By
युवराज पाटील-सकाळ वृत्तसेवा

शिरोली पुलाची : जिल्हा परिषद व पंचायत समितीची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपते. त्यामुळे स्थानिक नेत्यांना निवडणुकीचे वेध लागले असून, आरक्षणासह हातकणंगले तालुक्यात मतदारसंघाच्या फेररचनेकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

२०१७ च्या निवडणुकीत हातकणंगले तालुक्यात ११ जिल्हा परिषद, तर २२ पंचायत समिती मतदारसंघ होते. निवडणुकीनंतर हुपरी व हातकणंगले येथे नगरपालिका झाल्या. परिणामी हुपरी व हातकणंगले हे दोन जिल्हा परिषद मतदारसंघ आगामी निवडणुकीत कमी होणार आहेत; मात्र या मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या इतर गावांचा समावेश इतर मतदारसंघांमध्ये करावा लागणार आहे. त्यामुळे तालुक्यात मतदारसंघांची फेररचना करावी लागणार आहे. ती नेमक्या कशा पद्घतीने होणार, तालुक्यातील सर्वच मतदारसंघांची फेररचना होणार की, ती गावे नजीकच्या मतदारसंघात समाविष्ट केली जाणार याबाबत संभ्रमावस्था आहे.

पंचायत समिती पक्षीय बलाबल

 1. एकूण सदस्य : २२

 2. भाजप : ६

 3. जनसुराज्य : ५

 4. ताराराणी आघाडी : ६

 5. शिवसेना : २

 6. शेतकरी संघटना : २

 7. राष्ट्रीय काँग्रेस : १

हेही वाचा: जुने वाहन खरेदी करताय? फक्त 'NOC' नको, मूळ टॅक्‍स पावती घ्या, अन्यथा...

जिल्हा परिषद पक्षीय बलाबल

 1. एकूण सदस्य : ११

 2. भाजप : ५

 3. जनसुराज्य : २

 4. ताराराणी आघाडी : २

 5. शिवसेना : १

 6. शेतकरी संघटना : १

 7. राष्ट्रीय काँग्रेस : ०

जनसुराज्य सत्तेत; भाजप अल्पमतात?

हातकणंगले पंचायत समितीच्या विद्यमान सभागृहात सभापतिपद जनसुराज्यचे डॉ. प्रदीप पाटील यांच्याकडे आहे. सभापती निवडीच्या नाराजी नाट्यावरून भाजप अल्पमतात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पंचायत समितीची सत्ता कोणाकडे राहणार, याबाबत उत्सुकता आहे.

loading image
go to top