दिलासादायक! कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट घ्या जाणून

Akola News: Mortality rate ranks fourth in state, number of positive patients continues to rise
Akola News: Mortality rate ranks fourth in state, number of positive patients continues to rise

कोल्हापूर : जिल्ह्यात मागील तीन आठवड्यांपासून पॉझिटिव्हीटी (Covid 19) दर कमी झाला असून, हा आणखी दोन आठवड्यांत खूपच कमी येईल, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे (Dr kadambari Balkwade)यांनी आज पत्रकार परिषदेत केले. (kolhapur-district-covid-19-positivity-rate-trending-marathi-news)

डॉ. बलकवडे म्हणाल्या, ‘‘आरटीपीसीआर चाचणीची पॉझिटिव्हीटी रेटची आकडेवारी पाहता १६, १४ आणि १२ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. एक ते सात जुलैपर्यंत रोज चाचण्या वाढविल्या आहेत. तीन जुलैला ९४२७, चारला ६१८५, पाचला ११,२७३, सहाला १२,९८३ आणि सात जुलैला तब्बल १५,२१८ चाचण्या केल्या आहेत. आजपर्यंत ७५ हजार ६०८ चाचण्या झाल्या आहेत. इतर जिल्ह्यात रोज केवळ तीन हजार चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्या वाढविल्यामुळे सुपर स्प्रेडरना रोखण्यात यश येत आहे. माणगाव, पाचगाव, कबनूर अशा गावांत भेटी दिल्या असून, तेथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन समन्वयाने काम करीत आहे. उचगावमध्ये ग्रामपंचायतीकडून अलगीकरण केंद्रात चांगल्या सुविधा दिल्या आहेत. माणगावमध्ये ज्यांनी नियम मोडले आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. ही लढाई मिळून लढायची आहे.’’

होम आयसोलेशनबद्दल डॉ. बलकवडे म्हणाल्या, ‘‘ग्रामीण भागात ६५ टक्के होम आयसोलेशन होते, ते आता ३५ टक्क्यांवर आले आहे. शहरात ६७ वरून ४८ टक्क्यांवर आले आहे. रोज सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडून व्हीसीद्वारे याचा आढावा घेतला जात आहे. यासाठी गावपातळीवरील लोकप्रतिनिधी सहकार्य करीत आहेत.’’

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या भागात अधिक रुग्ण असल्याबाबत विचारले असता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, ‘‘इचलकरंजी भागात अधिक संख्या दिसत असली तरीही अनेक कामगार असून ते राहतात कबनूरमध्ये मात्र नोंद इचलकरंजीत होते. त्यामुळे रेट अधिक असल्याचे दिसते. करवीर आणि हातकणंगले तालुक्यात ग्रामपंचयातींची संख्याही अधिक आहे. त्या प्रमाणात आकडेवारी कमीच आहे.’’

पाणी तोडण्याचा इशारा

पाचगाव परिसरात आरोग्य कर्मचारी चाचणी करण्यासाठी गेल्यानंतर घराला कुलूप लावले जात असल्याचे आढळले. पाणी कनेक्शन तोडण्याचा इशारा दिल्यावर चाचणी करून घेतल्याचे उदाहरण आहे. उचगाव ग्रामपंचायतीने चांगली व्यवस्था केल्याचेही प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com