

Kolhapur District Municipal Election Results
sakal
कोल्हापूर : बराच काळ रखडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कौल आज स्पष्ट झाला. निकालाने प्रशासकराज संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ सुरू होणार असून, कारभारी आता शहरांचा कारभार पाहणार आहेत. काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी सत्तांतर केले, तर काही ठिकाणी स्थानिक गटांनी आपले गड राखले. जिल्ह्यात १० नगरपालिका आणि तीन नगरपंचायतीत आता ‘लोकराज्य’आले असून, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांसमोर असेल.
कागल : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू आघाडीचे नेते व कट्टर राजकीय विरोधक समरजिसिंह घाटगे यांच्याशी आघाडी करून नगरपालिकेची सत्ता अबाधित राखली. या आघाडीच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी खासदार प्रा. संजय मंडलिक आणि शिवसेना ठाकरे गटाला भोपळाही फोडता आला नाही.