कोल्हापुरातील सहा ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीला न्यायालयाकडून स्थगिती 

kolhapur district sarpanch election
kolhapur district sarpanch election

कुरुंदवाड - सरपंच निवडीसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीच्या रोटेशनमध्ये अनियमितता दिसत असल्याचे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने आज कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी, मजरेवाडी (ता. शिरोळ), कोगे, खुपीरे (ता. करवीर), उंड्री व फणसवाडी या सहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. याप्रकरणी याचिकाकर्त्यांच्या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने सुनावणी घेवून आरक्षण निश्‍चिती करावी तोपर्यंत सरपंचपदाच्या निवडी करु नयेत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. शिरटी (ता. शिरोळ) येथील याचिकाकर्त्यांचे वकील धैर्यशील सुतार यांनी ही माहिती दिली. 

नऊ फेब्रुवारीपासून सरपंच निवडी होणार होत्या; मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता या चारही गावांच्या सरपंचपदाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत प्रक्रिया 27 जानेवारीला झाली; मात्र आरक्षण सोडत प्रक्रियेत अन्याय झाल्याची भूमिका घेत शिरोळ तालुक्‍यातील या चारही गावातील उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत नव्याने आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी केली होती. ऍड. सुतार, ऍड. मनोज पाटील यांनी याप्रकरणी युक्तीवाद केला. न्यायमूर्ती शाहरुख काथवाला व न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

आरक्षण सोडतीमध्ये अनियमितता दिसून येत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले व याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल तक्रारींची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी व योग्य निर्णय घ्यावा व आरक्षण निश्‍चिती करावी, असे निर्देश देत तोपर्यंत सरपंचपदाच्या निवडणुका घेवू नयेत, असे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com