
Kolhapur : तंत्रज्ञानाच्या विकासातून आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारखे तंत्र आता सर्वश्रूत झाले. त्यातून सर्वच क्षेत्रांत मूलभूत बदल होत आहेत. उद्योगाची नवी क्षितिजे विस्तारत आहेत. संवाद क्रांतीमुळे दुर्गम भागातील व्यक्तीदेखील जगाच्या पटलावर आली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर २५ वर्षांनंतर जिल्ह्याचे चित्र काय असेल?, भविष्यातील आव्हानांची बिजे वर्तमानातच रोवली जात असताना, धोरण म्हणून कोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे?, यावर प्रकाश टाकण्यासाठी ‘सकाळ’तर्फे ‘व्हिजन कोल्हापूर’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘सकाळ’ कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज जिल्ह्याच्या विकासाचे मुद्दे मांडत विविध विषयांवर संवाद साधला.