esakal | Kolhapur : वैयक्तिक माहिती देऊ नका
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

Kolhapur : वैयक्तिक माहिती देऊ नका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नोकरी - व्यवसायासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी तरुणाईकडून आपल्या वैयक्तिक माहितीसह कौशल्याची माहितीही सोशल मीडिया अकाउंटवरून दिली जाते. त्याचा गैरवापर करून नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणाईची फसवणूक केली जाते. अशी फसवणूक टाळण्यासाठी सोशल मीडियावरून कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नका, असा संदेश सायबर पोलिस ठाण्याचे अंमलदार अजय सावंत यांनी दिला. सकाळ माध्यम समूहाच्या यिन व्यासपीठ व जिल्हा पोलिस यांच्यातर्फे सायबर सुरक्षा आणि आजची तरुणाई या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा झाली. यावेळी ते बोलत होते.

कार्यशाळेत श्रीमती अाक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, श्री विजयसिंह यादव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजया चव्हाण, सहकार भूषण एस. के. पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. वाय. एम. चव्हाण, डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रभारी प्राचार्य डॉ. शुभांगी पाटील, डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे कॅम्पस संचालक डॉ. सुनील आडमुठे, श्री अण्णासाहेब डांगे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. योजना जुगळे, राजर्षी शाहू कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. कांबळे, पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सचिन निटवे, प्रा. अवधूत जाधव, डॉ. गिरीष मोरे, प्रा. वर्षा पोतदार, प्रा. संदीप पाटील, प्रा. दीपक सूर्यवंशी, प्रा. डी. आर. माने यांनी सहभाग घेतला. प्रथमेश पाटीलने सूत्रसंचालन केले. यिन विभागीय अधिकारी अवधूत गायकवाड यांनी संयोजन केले.

loading image
go to top