Kolhapur Election : एका दिवसात तब्बल ८९ हरकती! चुकीच्या प्रभागात नाव गेल्याने मतदारांचा संताप वाढला!
Rising Voter List Errors : आतापर्यंतच्या हरकतींची संख्या २३२ वर गेली आहे. या हरकतींच्या सोडवणुकीसाठी सहायक आयुक्तांसह विविध अधिकारी रस्त्यावर उतरून दोष दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र आज शहरात विविध ठिकाणी पहायला मिळाले.
कोल्हापूर : प्रारूप मतदार यादीतील मोठ्या संख्येने मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात गेल्याचे टप्प्याटप्प्याने दिसत आहे. त्यामुळे हरकतींची संख्या वाढत असून, आज एका दिवशी ८९ हरकती दाखल झाल्या.