Kolhapur Citywide Clearance : कोल्हापूरात महापालिकेची धडाकेबाज कारवाई; जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील ११ अनधिकृत शेड हटवून १३ हातगाड्या जप्त
Encroachment Removal : नागरिकांच्या तक्रारी आणि न्यायालयाच्या निर्देशांनंतर महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेला गती देत दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई केली.
कोल्हापूर : शहरातील रस्त्यांलगतची वाढती अतिक्रमणे हटवण्यास महापालिकेने पुन्हा सुरू केले आहे. त्यानुसार आज दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकाजवळील व्यावसायिकांनी अनधिकृतपणे वाढवलेली ११ शेड हटवली.