

Kolhapur Engineering Student
esakal
कोल्हापूर : लाईन बझार, पद्मापथक परिसरात राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवकुमार हणमंत नाईक (वय २०, रा. जत, सांगली) असे मृताचे नाव आहे. तो अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. आज दुपारी हा प्रकार उघडकीस आला. मित्रांनी फास सोडवून त्याला उपचारासाठी ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.