कोल्हापूर: कळंबा परिसरातील एका लॉजवर बेकायदेशीर गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी छापा टाकला. मात्र, काही मिनिटे आधी बनावट डॉक्टरने सोनोग्राफी मशीनसह तेथून पळ काढला. .या ठिकाणी गर्भलिंग निदानसाठी आलेली एक महिला व एजंट महिला आढळली, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. .Milk Dairy License: दूध डेअरींना मोठा दिलासा! तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर नियम न पाळता कारवाई; परवाने निलंबनाला हायकोर्टाची स्थगिती.बालिंगा येथील कारवाईतील बनावट डॉक्टरचाच यामध्ये सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. जामिनावर सुटलेला एक बनावट डॉक्टर कळंबा परिसरातील लॉजवर गर्भवती महिलांना बोलावून घेत होता..पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या मदतीने तो गर्भलिंग निदान करणार असल्याची माहिती करवीर पोलिसांना समजली होती. रविवारी सायंकाळी पोलिसांच्या पथकाने लॉजवर छापा टाकला; पण काही वेळ आधीच हा बनावट डॉक्टर पळाल्याचे समजले. हा डॉक्टर यापूर्वी दोन कारवाईत सापडला आहे. आता त्याच्यावर काय कारवाई होणार? याकडे लक्ष आहे..Parbhani Police Seize ₹14.64 Lakh: एमडीच्या काळ्या धंद्यावर मानवत पोलिसांची मोठी कारवाई; 14.64 लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त, दोघांना अटक.आरोग्य विभागाचे अपयश?जिल्ह्यात गर्भलिंग निदानाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यापूर्वी झालेल्या गर्भलिंग निदान कारवायांची माहिती थेट पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहोचली होती. आजही पोलिसांनीच कारवाई केली. यामुळे आरोग्य विभागाकडून गर्भलिंग निदान रोखण्यासाठी नेमलेल्या समितीतील सदस्य नेमके करतात काय?, असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.