Farmers visiting service centers for AgriStack registration in Kolhapur.
sakal
कोल्हापूर
Kolhapur Agriculture : दोन लाख शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’विना, जिल्ह्यात ६६.६ टक्के नोंदणी पूर्ण, अजूनही शेतकरी योजनांपासून वंचित
Farmer ID : डिजिटल शेतीच्या दिशेने टाकलेले पाऊल असलेल्या ॲग्रीस्टॅक योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल दोन लाखांहून अधिक शेतकरी अजूनही नोंदणीबाहेर आहेत.
कोल्हापूर : ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांनी जमिनीचा सात-बारा, आधारकार्ड आणि लिंक असणारा मोबाईल क्रमांक याची नोंदणी महा-ई सेवा केंद्रावर जाऊन करायची आहे. गेल्या वर्षभरापासून याबाबत शासनाने आग्रही भूमिका घेतली आहे.

