Kolhapur Fire: गोकुळ शिरगाव MIDC मध्ये लागलेल्या भीषण आगीवर 'बफेलो फायर'च्या मदतीने चार तासानंतर नियंत्रण

Kolhapur Fire
Kolhapur Fireesakal

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत शेजारी असलेल्या शेरा फ्लक्स थर्मो केम प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेड फाउंड्री उद्योगासाठी लागणाऱ्या थर्मो रेगझिन या केमिकल उत्पादन कंपनीमध्ये आज दुपारी दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली.

साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नानंतरही आग दुमसत होती. आकाशात दूर अंतरावरून दिसणारे धुराचे प्रचंड लोट परिस्थितीचे गांभीर्य दर्शवित होते. या आगे मध्ये करोडो रुपयांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झाली नाही.

आग इतकी भीषण होती की आग आटोक्यात आणण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे तीन, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचे , कागल नगर परिषद, गोकुळ दूध संघ, व कोल्हापूर विमानतळावरील अत्याधुनिक रोजन बियर फायर फायटर अशा १४ हून अधिक अग्निशमन बंबांनी अनेक फेऱ्या मारत पाच तासाहून अधिक काळ तास शर्तीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली.

दरम्यान बॅरेल मधील केमिकलचे वारंवार स्फोट होत मोठा आवाज निर्माण करीत असल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, करवीर चे उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित घुले, यांच्यासह एनडीआरएफ जवान व अग्निशमन दलाचे जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

तामगाव (ता.करवीर) येथील गट नंबर ५७१ कांतीलाल पटेल यांच्या शेडमध्ये फाउंड्री साठी लागणारे थर्मो रेगझिन सॉल्व्हंट या केमिकलचा मोठा साठा या ठिकाणी होता .

कोल्हापूर विमानतळावरील सीनियर सुपरीटेंडर फायर इन्चार्ज सुनील वानखेडे कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलातील स्टेशन ऑफिसर दस्तगीर मुल्ला, सीनियर सुप्रीटेंडंट फायरिंगचार्ज विशाल खरात, महावितरणचे कागल उप कार्यकारी अभियंता विनोद घोलप, महेश पाटील व गोकुळ शिरगावचे सहाय्यक अभियंता सुहास शिंदे यांनी परिसरातील परिषदेचे कामगिरी ओळखून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित केला व घटनास्थळी परिस्थिती निरीक्षण ठेवून होते.

आमदार ऋतुराज पाटील यांची घटनास्थळी भेट

या आगीची माहिती मिळतात कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कार्याची पाहणी केली. तसेच आगीचे कारण व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची विचारपूस करीत संबंधित कंपनीचे अधिकारी, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांच्याशी संवाद साधत शर्तीचे प्रयत्न करणाऱ्या सर्व यंत्रणांचे कौतुक करीत मनोधैर्य वाढवले.

बफेलो फायर फायटरचा जलवा

घटनास्थळावर तात्काळ पोहोचलेल्या कोल्हापूर विमानतळावरील ऑस्ट्रिया (युरोप) बनावटीच्या रोजन बार बफेलो फायर फायटरने ए ट्रिपल एफ या आधुनिक तंत्राने फोमचा प्रचंड मारा करीत आग आटोक्यात आणण्यासाठी उल्लेखनीय काम केले.

दरम्यान पाण्याचा मारा केल्यानंतर सदर आग जास्तच भडकत असल्याचे लक्षात आल्यानंतर रोजन बार फोनचा प्रचंड मारा करीत यांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेची परिसरात जोरदार चर्चा सुरू होती.

अत्यंत ज्वालाग्रही असलेल्या या केमिकल ला लागलेली आग आटोक्यात आणणे अग्निशमन जवानांना मोठे आव्हान होते. कारण पाणी व फोमचा मारा करूनही सायंकाळी सात वाजेपर्यंत आग जास्तच भडकत होती अखेरीस एका कोपऱ्यातील आग विझवण्यासाठी वाळू मागवण्यात आली. व वाळूचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com