दोन ऑगस्ट रोजी बैरागदार आणि त्यांचे सहकारी ट्रॅक्टरने अकिवाट-बस्तवाड मार्गावरून शेताकडे जात असताना अचानक ट्रॅक्टर नदीत कोसळला होता.
कुरुंदवाड : ऑगस्ट महिन्यातील महापुरात (Kolhapur Flood) ट्रॅक्टर अपघातात (Tractor Accident) वाहून गेलेले अकिवाट (ता. शिरोळ) येथील माजी जिल्हा परिषद (Zilla Parishad) सदस्य इकबाल बाबासो बैरागदार (वय ५६) यांचा मृतदेह तब्बल साडेचार महिन्यांनंतर कर्नाटकातील इंगळी (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथे कृष्णा नदीच्या पात्रात सापडला. मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईल, सुपारीचा डबा आणि कपड्यांवरील खुणांवरून त्यांची ओळख पटली.