कोल्हापूरकरांनो नियम पाळा ; अन्यथा पुन्हा लॉकडाउन...

 Kolhapur follow the rules otherwise lockdown again
Kolhapur follow the rules otherwise lockdown again

कोल्हापूर - विनामास्क असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करा, अशा सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी; तर नियम काटेकोर न पाळले तर पुन्हा लॉकडाउन करावे लागेल, ट्रेसिंग होताच उपचार सुरू करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीसीमध्ये दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातून आज सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक अधिकारी यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

ग्रामविकासमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असून १५ ऑगस्टपर्यंत परिस्थिती अशी राहील. त्यासाठी सर्वांनी खबरदारी घेऊन पूर्वतयारी असली पाहिजे. रॅपिड न्टीजेन टेस्टला सुरुवात करावी. लक्षणे दिसल्यावर व्यक्तीला उपचारासाठी त्वरित दाखल करावे. नागरिकांनीही लक्षणे दिसल्यास स्वत:हून उपचारासाठी दाखल व्हावे, यासाठी प्रबोधन करावे. विशेषत: ग्रामीण भागात मास्क वापरण्यासाठी गावागावांत प्रबोधन करावे. जे विनामास्क असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. रुग्णसंख्या वाढत असतील, तर गावाने कडक लॉकडाउन करावे. एकही मृत्यू होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी.’’
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘सर्वांनीच सतर्क राहून खबरदारी घेण्याची गरज आहे. समूह संसर्ग थांबविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत; अन्यथा लॉकडाउन करावे लागेल. लक्षणे दिसल्यावर उपचार सुरू झाला पाहिजे.

त्यासाठी सर्वेक्षणाचा नियोजनासाठी वापर करा. सर्वेक्षण करणाऱ्या पथकांनी अधिक काळजी घ्यावी. मृत्यू रोखण्यासाठी ट्रेसिंग झाल्याबरोबर उपचार सुरू करा. व्याधिग्रस्त नागरिकांवर लक्ष केंद्रित करा.’’

कोरोनाला गांभीर्याने घ्या

कोरोनाला सर्वांनी गांभीर्याने घ्यावे. पुन्हा एकदा ग्राम समिती, प्रभाग समिती यांनी सक्रिय झाले पाहिजे. जर कुणी नियमांचा भंग करत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले. विशेषत: शिरोळ, जयसिंगपूर पालिकांनी सोमवारपासून कडक अंमलबजावणी करावी. यासाठी विशेष पथके नेमून पोलिस, गृहरक्षक दलाची मदत घ्यावी, अशाही सूचना दिल्या.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com