

Kolhapur Investment Racket Raises Questions on Probe
कोल्हापूर, ता. ३: क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याच्या प्रलोभनाला राज्यातील अनेक पोलिस बळी पडल्याचे समोर आले. सुमारे लाखांपासून दीड ४० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवलेल्या पोलिसांवर सध्या पश्चात्तापाची वेळ आल्याचे दिसून आले. गुन्ह्यांचा तपास करणारेच अडकल्याने या प्रकरणाचा तपास कोण करणार, असा प्रश्न सध्या उभा आहे. पोलिसांना गंडविल्याचे प्रकरण 'साम' वाहिनीने उघडकीस आणल्यानंतर कोल्हापूरपासून मुंबई, पुणे, नागपूरपर्यंत खळबळ उडाली आहे. Kolhapur Investment Racket Raises Questions on Probe