Kolhapur Petrol Shortage : कोल्हापूर जिल्ह्यातील 11 पेट्रोलपंप दुसऱ्या दिवशीही बंद; वाहनाधारकांच्या लांबलचक रांगा, काही पेट्रोलपंपांवरून नियमबाह्य वितरण सुरू

Fuel Shortage Forces Petrol Pumps to Shut Down in Kolhapur : कोल्हापुरात इंधन टंचाईमुळे ११ पेट्रोलपंप बंद झाले असून अफवेमुळे वाहनधारकांच्या रांगा लागल्या आहेत. आज दुपारपर्यंत इंधनपुरवठा सुरळीत होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
why petrol pumps closed in kolhapur

why petrol pumps closed in kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील ३१६ पेट्रोलपंप आहेत. त्यातील ११ पेट्रोलपंप इंधनसाठा नसल्यामुळे दोन दिवसांपासून बंद (kolhapur fuel shortage news) आहेत. त्यांना आज (ता.२६) इंधनसाठा मिळणार असून, ते पेट्रोलपंप दुपारपर्यंत सुरू होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, काल दुसऱ्या दिवशीही पेट्रोलपंपांवर वाहनाधारकांच्या रांगा होत्या. अनेक वाहनधारकांना पेट्रोल संपल्यामुळे माघारी परतावे लागले. काही पेट्रोलपंप साठा संपल्याने संध्याकाळी बंद झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com