
सिस्टीम जाण्यास अडथळा येत असल्याने एका मंडळाने चक्क गजानन महाराज नगरातील स्वागताची जुनी कमान पाडण्याचा घाट रचला.
कोल्हापूर : गणेशोत्सव (Kolhapur Ganeshotsav) असो वा इतर मिरवणुकांमध्ये भली मोठी साऊंड सिस्टीम (Sound System) लावण्याचे फॅड तरुणाईत मोठ्या प्रमाणावर आहे. अशा प्रकारची सिस्टीम जाण्यास अडथळा येत असल्याने एका मंडळाने चक्क गजानन महाराज नगरातील स्वागताची जुनी कमान पाडण्याचा घाट रचला. त्यासाठी जेसीबीही आणला. त्याची माहिती मिळताच भागातील नागरिक व महिलांनी त्याला जोरदार विरोध केला.