esakal | महिलांचा आक्रोश: नंग्या तलवारींचा धाक; महिलांसह सहा जण जखमी

बोलून बातमी शोधा

kolhapur ganjimal area crime marathi news

टिंबर मार्केट परिसरातील गंजीमाळ येथे शनिवारी दुपारी एका कार्यालयाच्या मोडतोडीवरून वाद झाला होता.

महिलांचा आक्रोश: नंग्या तलवारींचा धाक; महिलांसह सहा जण जखमी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : टिंबर मार्केट परिसरातील गंजीमाळ येथे काल रात्री आठच्या सुमारास वीस-पंचवीस जणांच्या गटाने नंग्या तलवारीसह एका घराची मोठी नासधूस केली. त्यात महिलांसह सहा जण जखमी झाले. परिसरातील १२ वाहनांची मोडतोड केली. गंजीमाळ येथे शनिवारी झालेल्या प्रकाराचे पर्यावसान आज तलवार हल्ला आणि तोडफोडीत झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत राजवाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी 

येथील ओंकार पांडुरंग जाधव यांच्या घरासमोरील नऊ दुचाकी, एक मध्यम आणि दोन मोठे टेंम्पो, एक सायकलची तरुणांच्या जमावाने मोडतोड केली. तलवार, काठ्या, बांबू, लोखंडी बार घेऊन तरुणांचा जमाव आल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी तलवारीची मोडलेली मूठ पोलिसांना मिळाली आहे.

दरम्यान, गणेश संजय जाधव, सिद्धी गणेश जाधव, सचिन पांडुरंग जाधव, विनोद पांडुरंग जाधव, सुप्रिया सतीश जाधव, अनुसया पांडुरंग जाधव जखमी झाल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. घटनास्थळी पोलिसांची मोठी कुमक मागिवली होती. पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांचा पाठलाग केला; मात्र कोणीही हाती लागला नाही. 

हेही वाचा- गुढी उभारू जबाबदारीची... बंदपेक्षा निर्बंध बरे -

टिंबर मार्केट परिसरातील गंजीमाळ येथे शनिवारी दुपारी एका कार्यालयाच्या मोडतोडीवरून वाद झाला होता. त्याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच वादाचे पर्यवसन आज तोडफोडीत झाले. आठच्या सुमारास टिंबर मार्केट कमानीच्या बाजूने वीस ते पंचवीस जण चालत आले. त्यांच्या हातात काठ्या, तलवारी, लोखंडी रॉड, बांबू होते. त्यांनी अचानकच जाधव यांच्या घरावर हल्ला केला. दारात असलेल्या दुचाकींवरही तलवारीचे वार केले. तेथे कलिंगडे भरलेला टेम्पो उलटून त्याचीही काच फोडून नुकसान केले. अन्य वाहनांचेही नुकसान केले. काहींनी जाधव यांच्या दुमजली घरात शिरून करून हल्ला केला.

तिजोरीसह संसार साहित्याचीही नासधूस केली. हा सारा प्रकार अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत घडल्याचे जाधव यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.महिलांचा आक्रोशघटनास्थळी प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. पोलिस आणि इतर घटनास्थळी येताच महिलांनी मोठा आक्रोश केला. महिलांनी घराचे नुकसान पोलिसांना दाखविले. एका जखमी महिलेला, तर रिक्षात घालून दवाखान्यात नेले जात असतानाही मोठा आक्रोश झाला. एक लहान मुलगीही जखमी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

संपादन-अर्चना बनगे