Kolhapur LPG shortage news
esakal
कोल्हापूर : आखाती युद्धामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. मात्र, घरगुती पुरवठा सुरू आहे. काही वितरक आणि ग्राहकांनी गॅस जादा दराने (Kolhapur gas shortage news) बाजारात विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. पंधराशे ते तीन हजार रुपयांपर्यंत हा सिलिंडर विकला जात असल्याचे समजते. त्यामुळे आता प्रशासनाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे.