International Banking : कोल्हापुरातून जर्मनीत होतात सर्वाधिक व्यवहार; ६९ देशांत उलाढाल, सुमारे १२०० कोटींहून अधिक उलाढाल
Kolhapur Trade : औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याची जागतिक स्तरावरही मजबूत ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बँकांमधून जगभरातील तब्बल ६९ देशांमध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातून जगभरातील तब्बल ६९ देशांत पैशांची देवाणघेवाण होते. जिल्ह्यातील तीन बॅंकांमधून ही देवाणघेवाण होते. पैकी एका बॅंकेतील वार्षिक आकडा सुमारे चारशे कोटींहून अधिक आहे.